कन्नड चित्रपट सृष्टीत पॉवर स्टार म्हणून ओळखले जाणारे अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांच्या एका चाहत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बेळगावात घडली आहे.

होय, ‘अप्पू’ आणि पॉवर स्टार या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार यांचे बेंगळुरातील इस्पितळात शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त टीव्हीवर दाखविण्यात येत होते. बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावचे परशुराम देमन्नावर हे पुनीत यांचे निस्सीम चाहते. शुक्रवारी घरात टीव्ही पहात बसले होते. पुनीत यांचा मृतदेह पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याने परशुराम यांनाही रात्री ११ च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला अन त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे शिंदोळी परिसरावर शोककळा पसरली आहे.
Recent Comments