Banglore

पुनीत यांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर !

Share

कन्नड अभिनेते पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कर्नाटकावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बेंगळुरातील कंठीरव स्टेडियममध्ये राज्यभरातून चाहत्यांची रीघ लागली आहे.

अभिनेते पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण कर्नाटक शोकसागरात बुडाला आहे. कन्नड चित्रपटसृष्टी सॅन्डलवूडसह बॉलिवूड, कॉलिवूड चित्रपट सृष्टीतील मान्यवर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या चाहत्यांची पुनीत यांच्या अंतिम दर्शनासाठी कंठीरव स्टेडियमवर रीघ लागली आहे. तेलगू चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते ज्युनियर एनटीआर यांनीही शनिवारी पुनीत यांचे अंतिम दर्शन घेतले. उद्या पुनीत यांच्यावर सर्व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पुनीत यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. बेंगळुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना राज्यपाल थावरचंद गेहलोत म्हणाले, पुनीत राजकुमार यांनी एक सशक्त अभिनेता म्हणून राज्यात आणि देशात कीर्ती मिळवली होती. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी बालपणापासूनच अनेक पुरस्कार मिळवले होते. ते कर्नाटकातील लाखो युवकाच्या गळ्यातील ताईत होते. त्यांच्या निधनाने भरून न येणारी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशा शब्दांत राज्यपाल गेहलोत यांनी श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, पुनीत यांच्या मुलीचे आगमन झाल्यावर त्यांच्या पार्थिवावर कंठीरव स्टेडियमवर शासकीय इतमामात त्यांचे कुटुंबीय आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येतील असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. अंत्यसंस्कारासाठी बृहत बेंगळूर महानगरपालिका आणि पोलीस खाते व्यवस्था करत आहे. पुनीत यांच्या निधनाने आम्हा सर्वाना दुःख झाले आहे. त्यांना शांततेत सन्मानाने आपण निरोप दिला पाहिजे. त्यासाठी सहकार्य करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आतापर्यंत लोकांनी चांगले सहकार्य केले आहे. आपण जबाबदारीने वागलो तर डॉ. राजकुमार आणि पुनीत याना सन्मान दिल्यासारखे होणार आहे. शांती, प्रेमाने राहणे ही आपली संस्कृती आहे. हे आज आपण विसरून चालणार नाही असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. बाईट

 

Tags: