कन्नड सिनेसृष्टीचे अभिनेते पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाचे दुःख कोणीही सहन करू शकणार नाही. परंतु नशिबासमोर कुणाचेही चालत नाही. पुनीत राजकुमार हे आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या आठवणी निरंतर स्मरणात राहतील, अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केलाय.

: बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, पुनीत राजकुमार यांचे निधन अत्यंत दुःखदायक असे आहे. त्यांच्या आत्म्याला ईश्वरचरणी शांतता मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. त्यांच्या निधनानंतर शिंदोळी येथील परशुराम या त्यांच्या चाहत्यालाही हृदयाघाताचा झटका आला आणि यात त्यांचे निधन झाले. तसेच एका युवकानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. पुनीत यांच्या निधनाची वार्ता आता प्रत्येकाने सहन करावी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यापद्धतीने आपण वागणूक ठेवावी, असे मत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, दोडमने हुडगा या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी बेळगावला आल्यावर आपल्या घरी येण्याचे वचन दिले होते. इतका मोठा सुपरस्टार असूनही कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसलेला इतका मोठा सुपरस्टार आपल्यातून निघून गेला, याचे आपल्याला अत्यंत दुःख झाल्याचे त्या म्हणाल्या.
पुनीत राजकुमार यांनी अनेक सरकारी जाहिरातींमध्ये काम केले. परंतु कोणत्याही कामाचे मानधन त्यांनी घेतले नाही, असे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुनीत राजकुमार यांच्यासंदर्भात आपल्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.


Recent Comments