हॅट्रिक हिरो, करुनाड चक्रवर्ती डॉ. शिवराजकुमार यांच्या अभिनयाने नटलेला बजरंगी -२ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या कारणास्तव त्यांच्या चाहत्यांनी शहरातील यंदे खुट परिसरातील श्री मारुती मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली.

अखिल कर्नाटक डॉ. राजकुमार अभिमानी संघाचे गट, डॉ. शिवराजकुमार अभिमानी संघ आणि अखिल कर्नाटक पुनीत राजकुमार अभिमान संघ, बेळगावचे जिल्हाध्यक्ष शेखर कालेरी यांच्या नेतृत्वाखाली सदर पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चित्रपट गृहे बंद होती. यामुळे कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले नाही. सध्या कोरोना प्रकरणे कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पूर्वपदावर येत असून दरम्यान चित्रपट गृहे देखील सुरु करण्यात आली आहेत. आज बजरंगी २ या करुनाड चक्रवर्ती डॉ. शिवराजकुमार यांच्या अभिनयाने नटलेल्या कन्नड चित्रपटाचे प्रदर्शन कण्र्यात आले. सदर चित्रपटाला भव्य यश मिळावे, यासाठी श्री मारुतीचे पूजन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया शेखर कालेरी यांनी दिली.
अभिमानी संघाचे पदाधिकारी शिवकुमार तलवार, रवी तळेमनी, महेश बसरीमराद, इरा अनगोळकर, परशुराम पाटील, सचिन बडिगेर, विनोद पाटील, फकीराप्पा मादिगर, श्रीशैल अंकलगी, संतोष कडोलकर, रमेश संनयोगोळ, मल्लेशी कावीम आदी उपस्थित होते.


Recent Comments