बेळगावातील हनुमान नगरचे ७६ वर्षीय रहिवाशी जोगिंदर भागसिंग बदान गुरुवारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

जोगिंदर भागसिंग बदान बेळगावच्या हनुमान नगरचे रहिवाशी असून काळ सकाळी ८.३०च्या सुमारास कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले आहेत. त्यांची उंची ५.९ इंच, रंग गहूवर्ण असून शरीरयष्टी सडपातळ आहे. त्यांना हिंदी व इंग्लिश भाषा बोलता येतात. घरातून जाताना त्यांनी ग्रे रंगाचा ती शर्ट, निळ्या चौकड्यांची हाफ पॅन्ट घातली आहे. त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यास कळविण्याचे आवाहन एपीएमसी पोलिसांनी केले आहे.


Recent Comments