Vijayapura

शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत उसाचा फड जळून खाक

Share

 शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत उसाचा फड जळून खाक झाल्याचं घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील उमरज गावात घडली.

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील उमरज गावात विद्युत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे ८ लाख रुपये किमतीचा ऊस जळून भस्मसात झाल्याची घटना घडली. मल्लप्पा इर्मानी आणि उमेश काशिनाथ हिरेन्नी यांच्या ४ एकरातील उसाच्या फडाला शॉर्ट सर्किटने आग लागली. पाहता-पाहता संपूर्ण फडच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत दोन्ही शेतकऱ्यांना ८ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. चडचण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 

Tags: