गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णा नदीवर जुगुळ ग्रामस्थांसाठी पूल निर्माण करण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांना समाधानाची बातमी मिळाली आहे.

: गेल्या अनेक वर्षांपासून जुगुळ ग्रामस्थ महापुराचा सामना करीत आहेत. येथे असलेल्या कृष्णा नदी तीरावर पूल बांधण्याची मागणी येथील नागरिक करीत होते. शेकडो वर्षांपासून येथील जनता बोटीतून नदी पार करीत आहेत. हा सारा प्रकार लक्षात घेऊन माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या यांच्या विशेष प्रयत्नातून सदर नदी तीरावर पूल बांधकाम कामकाजाला मंजुरी मिळाली आहे.
कृष्णा नदीतीरावर पूल बांधणी योजना मंजूर झाली असून प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजू कागे, कुडची आमदार पी. राजीव, रायबाग आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी साथ दिली. नदीकाठी असलेल्या जुगुळ गावातील लोकांसाठी खिद्रापूर – जुगुळ, चिंचली – मुळवाड, उगार – कुडची या तीन पुलांच्या निर्मितीसाठी २०१५ मध्ये मंजुरी मिळाली होती. सदर कामकाजासाठी २० कोटी रुपयांचे अनुदान देखील मंजूर झाले आहे. आता लवकरच हे सर्व पूल जनतेच्या सेवेत रुजू होणार आहेत.
माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नामुळे जुगुळ ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेला आता पूर्णविराम मिळणार असून अनेक वर्षांपासूनच्या मागणीचे आता काऊंटडाऊन सुरु झाले आहे.


Recent Comments