Vijayapura

काँग्रेस-जेडीएसवर मंत्री व्ही सोमाण्णा यांनी साधला निशाणा

Share

काँग्रेस आणि जेडीएस निवडणुका नजरेसमोर ठेऊन जनतेला खोटी आश्वासने देत आहेत. डिक्शनरी मध्ये असलेल्या सर्व शब्दांचा वापर केल्यानंतर जनता मत देत नाही तर जनता विकासाला मत देते असे मत , मंत्री व्ही सोमाण्णा यांनी व्यक्त केले आहे.

विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. काँग्रेस आणि जेडीएस हे डिक्शनरी मधील शब्द शोधून बोलत आहेत. पोटनिवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे सर्व बोलले जात आहे. राज्य किंवा देशाबद्दल त्यांनी काहीही भाष्य केले तरी जनता विकासालाच मत देईल, असा विश्वास मंत्री सोमाण्णा यांनी व्यक्त केलाय.

सिंदगी येथील जनता भोळी आहे. येथील जनता जो निर्णय देईल तोच आपल्याला मान्य करावा लागेल. राजकीय हेतू ठेवून कोणत्याही पद्धतीच्या आश्वासनांना जनता भुलणार नाही, असे ते म्हणाले. सिद्धरामय्या यांनी परिस्थितीबद्दल सर्व माहिती आणि अर्थ जाणून घेणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या विधानासंदर्भात मी दुखावलो गेलो आहे. त्यांचे बोलणे जनतेलाही असह्य होत असून गेल्या पन्नास वर्षांपासून त्यांच्या अशा बोलण्याने आता जनताही दुखावत असून सिद्धरामय्या यांच्याकडून अपप्रचार केला जात असल्याचे मंत्री सोमाण्णा म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्व कामकाज सुरळीत चालली असून कोणतेही कामकाज थांबले नसल्याचे ते म्हणाले.

Tags: