काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांचे नातेवाईक यु. बी. शेट्टी यांच्या धारवाडमधील निवासस्थानावर गुरुवारी सकाळी–सकाळीच प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

गोव्याहून आलेल्या प्राप्तिकर खात्याच्या ५ अधिकाऱ्यांच्या पथकाने शेट्टी यांच्या धारवाडमधील निवासस्थानी आज सकाळीच छापा मारला. धारवाडमधील दासनकोप्प सर्कलमध्ये शेट्टी यांचे आलिशान निवासस्थान आहे. ते मूळचे दक्षिण जिल्ह्यातील बेंदूरु तालुक्यातील उप्पून्द गावचे आहेत. राजधानी बेंगळुरसह बेंदूरु, गुलबर्गा येथे त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. प्राप्तिकर खात्याच्या ५ अधिकाऱ्यांच्या पथकाने शेट्टी यांच्या धारवाडमधील निवासस्थानी आज सकाळीच छापा टाकून महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु केली आहे.


Recent Comments