Belagavi

नवे शैक्षणिक धोरण विध्यार्थी पूरक : डॉ. विनोद गायकवाड

Share

नवे शैक्षणिक धोरण विध्यार्थी पूरक आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना दडपण घेता शिकून व्यक्तिमत्व विकास साधता येईल असे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाचे भाषा विभागाचे डीन डॉ. विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.

राणी चन्नम्मा विद्यापीठ प्राध्यापक संघ आणि दक्षिण कोकण शिक्षण संस्थेचे राणी पार्वतीदेवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात बुधवारी ‘नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत हिंदीचे अध्ययन’ या विषयावर कार्यशाळा झाली. आरपीडी महाविद्यालयात झालेल्या या कार्यशाळेचे उदघाटन डॉ. विनोद गायकवाड यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलनाने झाले. यावेळी हिंदी पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

उदघाटनानंतर बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे प्रचलित शिक्षण पद्धतीत अनेक आमूलाग्र बदल घडून येणार आहेत. हे धोरण विध्यार्थीपूरक आहे. पालक-शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर कसलेही दडपण आणू नये, विध्यार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. रूढ शिक्षण न घेताही प्रतिभेच्या जोरावर अनेकांनी चमकदार कामगिरी केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे विध्यार्थ्यांच्या इच्छेनुसार शिकण्यासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले आहे असे डॉ. गायकवाड यांनी तयावेळी सांगितले.

यावेळी राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. शोभा नाईक, डॉ. राजेंद्र पोवार, प्रा. एस. वाय. प्रभू, प्रा. अमित चौगुले यांच्यासह बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील हिंदी विषयाचे प्राध्यापक कार्यशाळेला उपस्थित होते.

 

 

 

Tags: