महामारी कोरोनाच्या संकटात सगळेजण घरात सुरक्षित बसले होते. मात्र त्या कठीण काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या रक्षणासाठी सेवा बजावलेल्या कोरोना योध्यांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा बेळगावात मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे गौरव करण्यात आला.

बेळगावच्या मिलिटरी हॉस्पिटलच्या महिला अधिकारी आणि रिसेप्शनिस्ट, कॅम्प पोलीस ठाण्यातील महिला शिपाई, कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य आदींचा कोरोना काळातील सेवेबद्दल बेळगावात बुधवारी एमएलआयआरसीच्या वतीने प्रमाणपत्र, स्मृतिचन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजसेवक व कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांचा ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्याहस्ते चांदीचे विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
एमएलआयआरसीचे सेंटर कमांडंट ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी एमएलआयआरसीचे अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते.


Recent Comments