कर्नाटक राज्योत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करूया असे आवाहन अथणी सीपीआय शंकरगौडा बसनगौडर यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथे मोठ्या उत्साहात राज्योत्सव दिन साजरा केला जातो. याचदिवशी मराठी भाषिक काळा दिन म्हणून आपले व्यवहार बंद ठेवतात. गेल्या दोन वर्षांपासून तालुका प्रशासनाने मंगसुळी गावातील व्यवहार सुरु ठेवण्यास भाग पाडले आहे. राज्योत्सव साजरा करण्याचे आवाहन करत राज्योत्सव साजरा करण्यात यशस्वी झाले आहे, असे अथणी चे सीपीआय शंकरगौडा बसनगौडर यांनी सांगितले.
बुधवारी मंगसुळीमध्ये कर्नाटक राज्योत्सवाच्या पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. आपण ज्या राज्यात राहतो त्याचा आदर करण्यासाटःई १ नोव्हेंबर रोजी भव्य प्रमाणात राज्योत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तहसीलदार राजेश बुरली बोलताना म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मंगसुळी मध्ये महसूल विभागाच्या अधिकारी पदावरून मंगसुळी गावचीविशेष काळजी मी घेत आहे. आज मी अधिकारी म्हणून आलो नसून राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले.
या बैठकीला दलित नेते संजय तळवलकर, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजू शेट्टी, सदस्य राजू कुलकर्णी, राजू नाईक, मुरली पाठोळे, पीएसआय बी. एम. रबकवी, उपतहसीलदार अण्णासाहेब कोरे, पीडीओ एम. आर. हिरेमठ आदींसह विविध अधिकारी, ग्रामस्थ आणि इतर नेते उपस्थित होते.


Recent Comments