३६ कोटी देवतांचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या गाईचे हिंदू संस्कृतीत अतिशय महत्व आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गाईची पूजा केली जाते. दिवाळीतील गोपूजनाला अतिशय महत्व आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या गोपूजनानिमित्त सर्व देवस्थानांमध्ये गोपूजन करण्यात यावे, असा आदेश मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिला आहे.

हिंदू संस्कृती मध्ये गाईच्या पूजनाचे महत्व आणि गाईसंबंधित जागरूकता निर्माण करण्यासाठी येत्या ५ नोव्हेंबर रोजी देवस्थानांमध्ये गो-पूजन करण्याचा आदेश धर्मादाय विभाग मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिलाय.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोपूजन केले जाते. हा सण अनेक ग्रामीण भागात साजरा केला जातो. दीपावली पाडवा या नावाने हा सण ग्रामीण भागात प्रचलित आहे. ज्याप्रकारे गंगापुजनाला महत्व आहे त्याचप्रमाणे गोपूजनाला देखील महत्व असून लक्ष्मीच्या स्वरूपात यादिवशी गोमातेचे पूजन करण्यात येत आहे. लक्ष्मी ज्यापद्धतीने सुख समृद्धी देते त्याचप्रमाणे गोमाताही अशाचपद्धतीने आपल्या दुधाच्या स्वरूपात समृद्धी प्रदान करते. कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी बलिप्रतिपदेला गोवर्धन पुजा देखील करतात. शेणाचा गोवर्धन पर्वत तयार केला जातो या पर्वतावर फुले वाहुन दुर्वा खोचल्या जातात. जवळच भगवान श्रीकृष्ण, राधा, गोपगोपीका, इंद्र, गायी वासरांची चित्र रेखाटुन त्यांची पुजा केली जाते आणि नैवेद्य दाखवीला जातो. कित्येक ठिकाणी भव्य मिरवणुक देखील काढली जाते. या सर्व गोष्टींना अनुसरून मंत्री शशिकला जोल्ले यांनी देवस्थानांमध्ये गोपूजन करण्याचे आदेश जारी केले आहेत.


Recent Comments