शाळा सुरु झालेल्या दिवशीच विध्यार्थ्याला शाळेतच सर्पदंश झाल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील मदमक्कळनाळ गावात घडली.

कोरोना महामारीमुळे गेल्या २० महिन्यांपासून बंद असलेल्या प्राथमिक शाळा कालपासून सरकारच्या ऐशवरुन सुरु झाल्या. हुक्केरी तालुक्यातील मदमक्कळनाळ गावातील प्राथमिक वर्गही भरविण्यात आले. मात्र पहिल्याच दिवशी मल्लिकार्जुन हरिजन या पाचवीतील विध्यार्थ्याला सर्पदंश झाल्याची घटना घडली. त्याने साप चावल्याचे शिक्षकांना सांगितल्यावर तातडीने त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना विध्यार्थी मल्लिकार्जुन हरिजन याने, आज खुश होऊन शाळेला गेलो होतो. मात्र मला सर्पदंश झाला. शिक्षकांनी मला तातडीने दवाखान्यात नेऊन उपचार केले असे पत्रकारांना सांगितले.
शाळा सुरु करण्यापूर्वी वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचा आदेश शासनाने बजावला होता. ते केले असते तर कदाचित ही घटना टळली असती अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


Recent Comments