Khanapur

खानापूर तालुक्यातील तरुणी बेपत्ता

Share

खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर या गावातील युवती बेपत्ता झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

सदर युवती दोड्ड होसूर या गावातील असून अंजना परशुराम पाटील (वय २२) असे तिचे नाव आहे. २१ ऑक्टोबर रोजी खानापूर शहरात जाऊन येते असे सांगून गेलेली अंजना घरी परतली नाही. सदर युवती खानापूर परिसरात चिरमुरकर गल्ली येथील एका क्लिनिकसमोर निदर्शनास आली होती. परंतु ती घरी परतली नसून सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या युवतीसंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास खानापूर पोलीस स्थानकाशी अथवा 083336-२२२३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इन्स्पेक्टर सुरेश शिंगी यांनी केले आहे.v

Tags: