Belagavi

कित्तूर उत्सवाचा समारोप; गाणी गाऊन जिल्हाधिकाऱ्यांचा सर्वाना सुखद धक्का !

Share

कित्तूर किल्ल्याच्या आवारात गेले दोन दिवस चाललेल्या कित्तूर उत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात झाला. यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी कन्नड गीते गाऊन सर्वाना सुखद धक्का दिला.

होय, राणी चन्नम्मानी ब्रिटिशांविरोधात युद्धात मिळवलेल्या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ कित्तूर येथील किल्ल्याच्या आवारात द्विशतकोत्तरी रौप्यमहोत्सवी कित्तूर उत्सवाचे शनिवारपासून २ दिवस आयोजन केले होते. त्याची सांगता रविवारी सायंकाळी झाली. प्रसिद्ध गायक विजयप्रकाश आणि सहकाऱ्यांनी यावेळी संगीतसंध्या कार्यक्रम सादर करून श्रोत्यांचे मनोरंजन केले. त्यांनी सादर केलेल्या गीतांवर उपस्थितांनी ठेका धरला. याचवेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनीही काही कन्नड गाणी सादर करून सर्वानाच सुखद धक्का दिला. तत्पूर्वी विविध कलासंघानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कलाविष्कार प्रकट केला. दरम्यान, कार्यक्रमावेळी थोडीफार हुल्लडबाजी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. फ्लो

Tags: