Kagawad

आ. श्रीमंत पाटील यांच्याहस्ते समुदाय भवनाची कोनशिला

Share

कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी गावातील अरिहंत शिक्षण संस्थेला राज्य अल्पसंख्यांक खात्याकडून मंजूर झालेल्या ५० लाख रुपये अनुदानातून बांधण्यात येणाऱ्या समुदाय भवनाची कोनशिला माजी मंत्री आ. श्रीमंत पाटील यांच्याहस्ते बसविण्यात आली.

सोमवारी सकाळी भूमिपूजन करून समुदाय भवनाची कोनशिला बसविल्यानंतर बोलताना माजी मंत्री आ. श्रीमंत पाटील म्हणाले, माझ्या अल्पसंख्यांक मंत्रिपदाच्या काळात कागवाड, अथणी, चिक्कोडी, रायबागसह जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायाला भवन, मशिदी, मंदिरे बांधण्यासाठी अनुदान मंजूर केले होते. शिरगुप्पी गावातील अरिहंत शिक्षण संस्थेला समुदाय भवनाची गरज होती. त्यामुळे ५० लक्ष रुपयांचे अनुदान मंजूर करवून घेतले आहे.

या निधीतून दर्जेदार समुदाय भवन उभारून संस्थेसाठी, समाजासाठी त्याचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बाईट
यावेळी शिरगुप्पी ग्रापं अध्यक्षा गीतांजली चौगुला, दादागौडा पाटील, संस्थेचे अध्यक्ष अनिल चौगुले, संचालक बोम्मन चौगुले, विजय अकिवाटे, भीमू अकिवाटे, सुरेश चौगुले, महावीर कात्राळे, कपिल मालगावे आदी उपस्थित होते.

Tags: