सध्या राज्यातील दोन मतदार संघामध्ये पोटनिवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये आरोप – प्रत्यारोपाची स्पर्धा चांगलीच जुंपली आहे. देशात आणि राज्यात काँग्रेसचा सर्वनाश होण्याची वेळ जवळ आली आहे, अशी टीका करत माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी भविष्य वर्तविले आहे.

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या एच. डी . रेवण्णा यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. देशात विश्वासघात करणारा पक्ष म्हणून काँग्रेसचे नाव आहे. काँग्रेसने मुस्लिम उमेदवार उभा केला असून या निवडणुकीत मतदार योग्य उत्तर देतील, असे ते म्हणाले.
सुटकेस संस्कृती हि काँग्रेसमध्ये आहे. जेडीएसमध्ये नाही. राज्यसभा, विधानसभा निवडणुकीत सर्वप्रथम सुटकेस ठेवण्यात येते. त्यानंतर मतयाचना करण्यात येते, हि काँग्रेसची संस्कृती आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी कधी पैसे दिले आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत मागील निवडणुकीत राज्यसभा निवडणूक लढविणाऱ्या फारूक शेख यांना ५ कोटी रुपये घेऊन पराभूत व्हावे लागले. अशापद्धतीने पराभूत होण्याची लाज वाटते का? असा सवालदेखील रेवण्णा यांनी उपस्थित केला.
काँग्रेस आणि जेडीएसने हातमिळवणी केल्यानंतर तुमकूरमध्ये देवगड यांचापराभव झाला. मांड्या आणि के आर पेठ येथे जेडीएसचा पराभव झाला. माजी पंतप्रधान चरणसिंग, देवेगौडा आणि चंद्रशेखर यांना याच काँग्रेसमुळे पडउतार व्हावे लागले होते, असा आरोपदेखील रेवण्णा यांनी केला.
सध्या होत असलेल्या सिंदगी पोटनिवडणुकीसाठी मुस्लिम समाजाच्या एम. ए. पदवीधर असलेल्या नाझिया शेख अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली असून देवेगौडा मुख्यमंत्री असताना १०८ जणांना मागासवर्गीय आरक्षण देण्यात आले होते. अल्पसंख्यांकांना शेकडा ४ टक्के इतके आरक्षण देण्यात आले होते. परिशिष्ठ समाजाला आरक्षण न मिळण्याने आम्ही मंत्रिपदाचा त्याग केला. देवेगौडा यांनी केलेल्या आंदोलनाचे फळ म्हणून राज्यातील १८ जण आमदार झाले, असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार चन्देप्पा काशेम्पूर, सिंदगी पोटनिवडणूक लढविणाऱ्या जेडीएसच्या उमेदवार नाझिया शकील अंगडी यांच्यासह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments