Chikkodi

चिक्कोडी तालुक्यात घंटा वाजली, शाळा भरली !

Share

अनेक दिवसांच्या मध्यंतरानंतर चिक्कोडी तालुक्यात सोमवारपासून पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्यास प्रारंभ झालाविध्यार्थ्यानी अत्यंत उत्साहाने शाळा गाठून अभ्यास सुरु केला.

कोरोना महामारीमुळे गेली सुमारे दीड वर्षे राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सरकारच्या आदेशानुसार मार्गसूचीचे पालन करत आजपासून प्राथमिक विभागाचे वर्ग भरवण्यात आले आहेत. सरकारच्या आदेशानुसार चिक्कोडी तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उष्मांक तपासणी अर्थात थर्मल स्क्रीनिंग करून शाळेत प्रवेश देण्यात आला. येडूर येथे शिक्षकांकडून शाळेत रांगोळ्या घालून टाळ्या वाजवत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. सामाजिक अंतर राखले जाईल अशा पद्धतीने आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

एकंदर दीड वर्ष घरात बसून कंटाळलेल्या विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही शाळा सुरु झाल्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.

 

Tags: