जन्मतः किंवा अपघातानं हात–पाय गमावलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचं कार्य रोटरी परिवाराने केले.

होय, बेळगाव आणि इचलकरंजी येथील रोटरी क्लब आणि बेळगावातील विजया ऑर्थो अँड ट्रामा सेंटरच्या वतीने बेळगावात रविवारी कृत्रिम हात-पाय जोडणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद लाभला. 
या संदर्भात बोलताना रोटेरियन शशिकांत नायक म्हणाले, जन्मतः किंवा अपघातानं हात-पाय गमावलेल्या व्यक्तींसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. रोटरी क्लबतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून हात-पाय नसलेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवन जगताना अडचण येऊ नये यासाठी अशा प्रकारची शिबिरे भरविण्यात येत आहेत. यात आम्हाला विविध संघ-संस्थांची मदत मिळत असते असे त्यांनी सांगितले.
या शिबिरात विविध ठिकाणांहून आलेल्या अपंग व्यक्तींच्या हातपायांची मापे घेऊन कृत्रिम हातपाय जोडण्यात आले. रोटरी क्लब परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.


Recent Comments