हुक्केरीजवळील गजबरवाडी येथे हजरत गजबरसाब उरूस साधेपणाने पण श्रद्धापूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे.

गेल्या २ दिवसांपासून हुक्केरीजवळील गजबरवाडी येथे हजरत गजबरसाब उरूसाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पंच कमिटीच्या वतीने गलिफ चढवून संदल चढविण्यात आला. त्यानंतर रात्री प्रसिद्ध कव्वालीपटूंचा कव्वाली कार्यक्रम पार पडला. या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना राजू मुजावर आणि सतरज मुजावर यांनी सांगितले की, गेल्यावर्षी साधेपणाने उरूस साजरा करण्यात आला होता. यंदा सरकारच्या मार्गसूचीनुसार पंच कमिटीने उरुसाचे आयोजन साधेपणाने केले आहे.
हिंदू-मुस्लिम बांधव त्यात श्रद्धेने सहभागी होऊन सौहार्द आणि एकतेचे दर्शन घडवीत आहेत. देशातून कोरोना महामारीचे लवकर उच्चाटन होऊ दे अशी प्रार्थना हजरत सय्यद गज्जबरलाल साहब यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जमात अध्यक्ष मलिकजान मुजावर, सचिव अमजद अली मुजावर, राजू मुजावर, शानजाद मुजावर, सतरज मुजावर आणि उरूस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उरुसानिमित्त दर्ग्यावर विद्युत रोषणाई केली आहे.


Recent Comments