Belagavi

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी बेळगावात झाली लेखी परीक्षा

Share

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी बेळगावात आज, रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली.

पोलीस बनून जनतेची सेवा करायची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या असंख्य उमदेवरानी आज बेळगावात पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा दिली. बेळगावातील विविध हायस्कुलमधील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. रविवारी दुपारी १२ ते १ या वेळेत पोलीस पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली.

त्यासाठी एकूण २१ परीक्षा केंद्रे स्थापन केली होती. परीक्षाकेंद्र परिसरात २०० मीटरपर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले होते. सर्व परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी आधारकार्ड, ओळखपत्र, प्रवेशपत्र आदी कागदपत्रांची तपासणी करून केंद्रात प्रवेश देण्यात आला. त्याशिवाय उमेदवारांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. परीक्षा केंद्रात कोविड मार्गसूचीचे पालन करून सामाजिक अंतर राखून आसन व्यवस्था करण्यात आली होती.

 

Tags: