Kittur

ऊर्जा निर्मिती केंद्रांना स्वदेशी कोळशाचा पुरवठा : केंद्रीय मंत्री जोशी

Share

देशात ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या दगडी कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे हे खरे. मात्र तीच संधी मानून आम्ही स्वदेशी कोळशाचा पुरवठा ऊर्जा निर्मिती केंद्रांना करत आहोत असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे आयोजित कित्तूर उत्सवात भाग घेण्यासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री जोशी पुढे म्हणाले, अतिवृष्टी आणि वाहतुकीचे वाढलेले दर यामुळे कोळशाची टंचाई देशात निर्माण झाली होती. हे संकट आम्ही संधी मानले आहे. देशात स्वदेशी कोळशाचे अपार साठे आहेत. तेथूनच वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा पुरवण्यात येत आहे.

बेळगाव-धारवाड रेल्वे योजनेबाबत ते म्हणाले, कित्तूर येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. राज्य सरकारची ही अपेक्षा आम्ही पूर्ण करू, बेळगाव-धारवाड रेल्वे योजना निर्दिष्ट मुदतीत पूर्ण झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी राज्य सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया तातडीने सुरु केली पाहिजे. किमान ८०% जमीन अधिग्रहण झाल्यास केंद्र सरकार योजनेचे काम सुरु करेल. ही योजना पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ वाचेल. राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून दिल्यास कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ केंद्र सरकार उभारेल असे यांनी सांगितले.

सिंदगी, हानगल पोटनिवडणुकीत येडियुरप्पा यांचा पत्ताच नाही या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विधानाचा समाचार घेताना केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले, येडियुरप्पा हे राज्यातील आणि पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी २-२ दिवस सिंदगी, हानगलमध्ये प्रचार केला आहे. डीकेशी आणि सिद्दरामय्या यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. डीकेशी यांच्याविरोधात सिद्दरामय्या यांनीच सलीम यांच्या माध्यमातून डीकेशी यांच्याशी संबंधित व्हिडिओ जारी केला आहे. त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी हे दोघे येडियुरप्पांचे नाव जप्त आहेत. काँग्रेस नेत्यांनी आधी आपल्यातील अंतर्गत मतभेद मिटवावेत असा सल्ला त्यांनी दिला.

 

Tags: