बेळगाव पोलिसांनी शनिवारी रात्री अचानक धाडसत्र अवलंबून शहर–परिसरातील १००हुन अधिक लॉजेसवर धाडी टाकल्या.

होय, कसलीही पूर्वसूचना न देता, कोणाला जराही कळू न देता बेळगाव पोलिसांनी शहरातील सुमारे १००हुन अधिक लॉजेसवर शनिवारी रात्री धाडी टाकल्या. लॉजमध्ये कोणते गरीप्रकर चालतात का याची पडताळणी केली. त्याशिवाय नियम आणि सूचनेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत का नाही याची शहानिशा केली.
लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांना राहण्याची व्यवस्था करण्यापूर्वी त्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड व तत्सम पुरावा सक्तीने घेण्याची सूचना करण्यात आली. त्याशिवाय येणाऱ्या ग्राहकांनी सक्तीने रजिस्टरमध्ये नोंद करावी असे मालक व लॉज मॅनेजरना सांगण्यात आले. लॉजमधील खोल्यांचीही तपासणी करण्यात आली. एसीपी आणि सीपीआय यांच्या नेतृत्वाखालील ५०हुन अधिक पोलिसांच्या पथकांनी या कारवाईत भाग घेतला. मात्र अचानक व अनपेक्षितपणे घातलेल्या या धाडींमुळे लॉजमालक-व्यवस्थापकांत खळबळ माजली आहे.


Recent Comments