Kittur

कित्तूर येथे लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ : उद्योगमंत्री निराणी

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे राणी चन्नम्मा यांच्या नावे लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल अशी माहिती मध्यम बृहत उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली.

रविवारी कित्तूर येथे पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी, कित्तूर उत्सव यशस्वी केल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे अभिनंदन केले. तेम्हणाले, याठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावा अशी येथील लोकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आगामी काळात वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या नावे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मागास विध्यार्थ्यांसाठी १ हजार कोटी रुपये दिले आहेत. हुबळी-धारवाड-बेळगाव-होस्पेट यांना जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम लवकरच प्रारंभ करण्यात येईल असे मंत्री निराणी यांनी सांगितले.  दरम्यान, कित्तूरच्या विकासासाठी अनेक घोषणा सरकार करते. मात्र कार्यवाही शून्य आहे. त्यामुळे विमानतळाच्या या नव्या आश्वासनांचे काय होते हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

 

Tags: