Belagavi

विविध कन्नड संघटनांतर्फे बेळगावात कित्तूर विजयोत्सव

Share

विविध कन्नड संघटनांतर्फे बेळगावात शनिवारी कित्तूर विजयोत्सव साजरा करण्यात आला.

कित्तूर विजयोत्सवानिमित्त विविध कन्नड संघटनांतर्फे बेळगावातील चन्नम्मा चौकात वीर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे कोर्ट आवारातील संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना कन्नड संघटनांच्या कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी म्हणाले, १८२३मध्ये ब्रिटिशांविरोधात बंद पुकारून राणी चन्नम्मा यांनी विजय मिळवलेला दिवस २३ ऑक्टोबर होय. यानिमित्त आज कन्नड संघटनांच्या वतीने कित्तूर विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. कित्तूर येथील उत्सवाच्या उदघाटनाची येत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई-कर्नाटक भागाला कित्तूर कर्नाटक नाव देण्याची मागणी त्यांनी केली.  यावेळी कन्नड संघटनांचे नेते महांतेश तळवार, मैनुद्दीन मकानदार, शंकर बागेवाडी, रमेश सोनटक्की, सुरेश गवन्नावर, दीपक गुडगनट्टी आदी उपस्थित होते.

 

Tags: