Hukkeri

अप्पनगौडा पाटील यांची संकेश्वरात ४७वी पुण्यतिथी

Share

 सहकार महर्षी, स्वातंत्र्यसैनिक अप्पनगौडा पाटील यांचा ४७वा पुण्यतिथी निमित्त संकेश्वरच्या श्री दुरधुंडीश्वर विध्यावर्धक संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संकेश्वरातील एस. डी. हायस्कुलच्या सभागृहात बेळगावच्या नागनूर रुद्राक्षी मठाचे अल्लमप्रभू स्वामीजींच्या सान्निध्यात झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी अप्पनगौडा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. यावेळी श्री दुरधुंडीश्वर विध्यावर्धक संघाचे विशेष कामगिरी केलेले विध्यार्थी, प्राध्यापक, सेवानिवृत्त शिक्षकांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी संघाच्या आवारातील अप्पनगौडा पाटील आणि बसगौडा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी म्हणाले, कर्नाटकाच्या सीमा भागात अनेक शिक्षण संस्था, सहकारी संस्था, इस्पितळे सहकारी तत्वावर सुरु करून विद्याज्ञान, कामगारांना रोजगार आणि गरिबांना आरोग्यसेवा देणाऱ्या अप्पनगौडा पाटील यांचे कार्य त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. आजच्या युवापिढीला त्यांचे कार्य आदर्श आहे. त्यांचे  नाव अमर राहण्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. मीसुद्धा यासंदर्भात सरकार पातळीवर प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी डीव्हीएस संघाचे उपाध्यक्ष जी. एस. इंडी, सचिव जी. सी. कोटगी, सदस्य गंगाधर मूडशी, आर. बी. पाटील, विजय रवदी, बसगौडा पाटील, काशिनाथ शिरकोळी, पी. डी. पाटील, डी. एस. केस्ती, एम. डी. माधुरी हेब्बाळकर, प्रशासकीय अधिकारी बी. ए. पुजेरी, प्राचार्य, शिक्षक, विध्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: