
हनगल विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज हंगल विरक्त मठाला भेट देऊन तेथील राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.हनगल पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी हनगल दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज प्रचारापूर्वी विरक्त मठाला भेट दिली. यावेळी राणी चन्नम्मा यांच्या जयंतीनिमित्त येथील कित्तूर चन्नम्मा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ब्रिटिशांविरोधात आंदोलन छेडून वीरराणी चन्नम्मा यांचे जीवन आमच्यासाठी आदर्शावत आहे. स्फूर्तिदायक आहे. कित्तूर विकासाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली असून हा उत्सव केवळ बेळगावपुरता मर्यादित ना ठेवता पुढील काळात बेंगळुरपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यानंतर दोन माजी मुख्यमंत्र्यांकडून होत असलेल्या टीका, आरोपांसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, याबाबत विधानसौधमध्ये चर्चा करण्यात आली आहे. सिद्धरामय्या यांनी येडियुरप्पा यांच्यात साहस नसल्याने बोम्मई यांना प्रचारासाठी बोलाविण्यात येत असल्याचा टोला लगावला होता यावर मुख्यमंत्री म्हणाले, असे असेल तर डिके शिवकुमार यांच्यात साहस नाही म्हणून सिद्धरामय्या प्रचार करत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित करून विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले आहे.
यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हनगल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन केले. यावेळी भाजप उमेदवार शिवराज सज्जनर आणि इतर भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments