चिक्कोडी तालुक्यातील करगाव ग्राम पंचायतीच्या वतीने रोजगार हमी योजनेतील कामे जेसीबीने करून गरीब मजुरांना मिळवायची हक्काची वेतनापोटीची रक्कम लुटण्यात आल्याचा आरोप धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते काडगौडा पाटील यांनी केला.

चिक्कोडी येथे पत्रकारांशी बोलताना जेडीएस नेते काडगौडा पाटील यांनी सांगितले की, करगाव ग्रापंच्या वतीने २००८मध्ये राबविलेल्या संपूर्णग्राम योजनेची माहिती विचारल्यावर पंचायत विकास अधिकाऱ्यांनी अपेक्षित उत्तर न देता कोरे कागद पाठवले आहेत. त्यांचा हा बेजबाबदारपणा जिल्हा पंचायत सीईओंच्या निदर्शनास आणून दिला आहे.
एवढेच नव्हे तर पीडीओ, ग्रापं अध्यक्ष-उपाध्यक्षांनी मनमानी करून गरिबांना रोजगार मिळवून देण्याऐवजी जेसीबीने कामे करून पैसे लाटला आहे. या सर्व भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा पंचायत सीईओंनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
यावेळी करगावचे ग्रामस्थ महादेव नेर्ली उपस्थित होते.


Recent Comments