बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी खा. रमेश कत्ती यांच्या वाढदिवसानिमित्त कंत्राटदार तिम्मण्णा गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडी सरकारी इस्पितळात बिस्कीट व फळे वाटण्यात आली.

कंत्राटदार तिम्मण्णा गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली चिक्कोडी सरकारी इस्पितळात गुरुवारी रुग्णांना बिस्कीट व फळे वाटण्यात आली. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी खा रमेश कत्ती यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. त्यानंतर बोलताना कंत्राटदार तिम्मण्णा गाडीवड्डर म्हणाले, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी खा. रमेश कत्ती यांचा आज ५८वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीब रुग्णांना फळे वाटली आहेत. रमेश कत्ती यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अर्जुन किवड, सुरेश ब्याकुडे, बसाप्पा दानप्पगोळ, सिद्धार्थ माळगी, बाबू घरगुडे, बिरजू उप्पर, सिद्धू कंडी, डॉ. संतोष कोंनारे आदी उपस्थित होते.


Recent Comments