Belagavi

२४ ऑक्टोबरला मोफत कृत्रिम अवयव जोडणी शिबीर

Share

बेळगावातील रोटरी परिवाराच्या वतीने येत्या २४ ऑक्टोबरला विजया ऑर्थो अँड ट्रामा सेंटरमध्ये अपंगांसाठी मोफत कृत्रिम हात पाय जोडणी शिबिराचे आयोजन केल्याची माहिती रोटेरियन अशोक मळगली यांनी दिली.

बेळगावात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रो. अशोक मळगली म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून रोटरी क्लबतर्फे बेळगावात मोफत कृत्रिम अवयव जोडणीसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. बेळगाव जिल्ह्यात २०१५ मध्ये २००, २०१७मध्ये ४०० अपंगांनी याचा लाभ घेतला आहे. यावेळी मोफत कृत्रिम अवयव जोडणीसाठी ५००हुन अधिकजणांनी अर्ज केले आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील अपंगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी रोटेरियन अरविंद खडबडी, विनय बाळीकायी, अशोक नायक, चंद्रकांत राजमाने आदी उपस्थित होते.

 

Tags: