माजी खा. रमेश कत्ती यांच्या वाढदिवसानिमित्त हुक्केरीत रक्तदान शिबीर घेण्यात आले.

हुक्केरी तालुका कंत्राटदार संघटना आणि रमेश कत्ती अभिमानी बळगच्या वतीने हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी आणि विरक्त मठाचे शिवबसव स्वामीजींच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य पवन कत्ती यांच्याहस्ते रोपाला पाणी घालून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कंत्राटदार पुंडलिक नांदगावी आणि मल्लप्पा बिसिरोट्टी यांच्याहस्ते स्वामीजींचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर रमेश कत्ती यांच्या अभिमानी कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी बोलताना पवन कत्ती म्हणाले, सामान्यपणे वाढदिवस पैसे खर्च करून थाटामाटात साजरा करण्यात येतो. मात्र कंत्राटदार आणि कार्यकर्त्यांनी रमेश कत्ती यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर आयोजित करून साजरा करत आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. हा उपक्रम स्तुत्य आहे असे सांगितले. याप्रसंगी पृथ्वी कत्ती, मोशिनबेग इनामदार, बसू गंगण्णावर, संजू चिक्कोडी, रवी जुटाळे, पुट्टू खाडे, भरतेश नाईक, कमते, भाजप नेते गुरुराज कुलकर्णी, महावीर निलजगी तसेच हुक्केरी आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments