Belagavi

‘बुडा’च्या अध्यक्षपदी भाजपनिष्ठ शिलेदार संजय बेळगावकर

Share

 बेळगाव नगरविकास प्राधिकरण अर्थातबुडाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे जुनेजाणते कार्यकर्ते संजय बेळगावकर यांची सरकारने नियुक्ती केली आहे. वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विध्यमं अध्यक्ष घुळाप्पा होसमनी याना डच्चू देऊन भाजपनिष्ठ बेळगावकर यांची यपदी निवड करण्यात आली आहे.

बेळगावातील भाजप आ. अभय पाटील आणि आ. अनिल बेनके यांचे मत विचारात न घेता होसमनी यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे हे दोन्ही आमदार नाखूष होते. बुडाच्या बैठकांनाही त्यांनी दांडी मारली होती. दोन्ही आमदार आणि होसमनी यांच्यातून विस्तव जात नसल्याने बुडाच्या योजना राबवण्यातही अडचणी येत होत्या.

होसमनी यांनी तर अलीकडे दोन्ही आमदारांचे नाव घेऊन त्यांच्या असहकार्यामुळे बुडाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याचा जाहीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर बुडा अध्यक्ष बदलण्यात आला आहे. नवे अध्यक्ष भाजपचे जुने व एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. बेळगावात भाजपची मजबूत संघटना बांधणाऱ्या पहिल्या फळीतील मोजक्या कार्यकर्त्यांपैकी ते एक आहेत. गुरुवारी त्यांनी बुडा कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

Tags: