विजापूर जिल्ह्यातील तिकोटा शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी सकाळी जोरदार आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली आहे.

होय, गेल्या काही महिन्यांपासून विजापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी साखळी भूकंपाचे सत्र सुरु झाले आहे. बुधवारी सकाळी तिकोटा शहरासह तालुक्यातील कळ्ळकवटगी, घोणसगी, बाबानगर, बिज्जरगी, हुबनूर, लोहगाव, दनसर्गि, टक्कळकी, होनवाड, सोमदेवरहट्टी, मलकनदेवरहट्टी आदी गावांत आज सकाळी १०.२९च्या सुमारास जमिनीतून जोरदार आवाज झाला आणि भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर दुसऱ्यांदा १०.५९ च्या सुमारासही जमिनीतून जोरदार आवाज झाला आणि जमिनीतून कंपने जाणवली. गेल्या २ ऑक्टोबरला येथे भुकंप झाला होता.
रिश्टर स्केलवर त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू बिज्जरगी गाव नोंदवण्यात आले होते. त्यानंतर १८ ऑक्टोबरला झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू सोमदेवरहट्टी असल्याचे स्पष्ट झाले होते. पण या दोन्ही भूकंपांच्या तुलनेत आज तिसऱ्यांदा झालेल्या भूकंपाची तीव्रता अधिक जाणवली. आज भूकंप होण्याआधी गावातून कुत्र्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरवात केली. त्यानंतर काही वेळातच जोरदार गडगडाटासह कंपने झाली. घरात कपाटात ठेवलेली भांडी, वस्तू खाली पडल्या. त्यामुळे घरातील सदस्यांना सोबत घेत घराबाहेर आलो असे बाबानगरचे शंकरगौडा बिरादार, तिकोटाचे मल्लिकार्जुन टक्कळकी, घोणसगीचे चिक्कय्या कारजिनगी यांनी सांगितले.
घर सोडून गल्लीत जमा झालेल्या ग्रामस्थांनी भूकंपाविषयी चर्चा करत आपापल्या नातेवाईकांना मोबाईलवरून याची माहिती दिली. वरचेवर होत असलेल्या भूकंपामुळे तिकोटा तालुकावासियांत दहशतीचे वातावरण पसरले असून, अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन योग्य माहिती देऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. बाईट


Recent Comments