कौटुंबिक त्रासाला कंटाळून बेळगाव तालुक्यातील हलगा शिवारामध्ये आंब्याच्या झाडाला गळफास लावुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.

३५ वर्षीय जिन्नाप्पा वासू पाटील, रा बस्ती गल्ली हलगा असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. जिन्नाप्पा याचा दुसरा विवाह झाला होता. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने 3 वषापुवी पुन्हा विवाह केला होता सोमवारी रात्री सासरी जाऊन त्याने किरकोळ भांडणही काढल्याचे समजते. त्यानंतर हलगा येथे येऊन झाडाला गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले. कौटुंबिक त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चर्चा आहे. हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळाला पाठविला. जिन्नाप्पा याच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ बहीण असा परिवार आहे.


Recent Comments