Khanapur

भाजप-काँग्रेस नेत्यांमधील बॅनर वॉर सुरूच !

Share

: बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजपकाँग्रेस नेत्यांमधील बॅनर वॉरने आता वेगळेच रूप घेतले आहे. मतदार संघातील जनतेनेच आता . लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीशी उभे राहून नवा बॅनर लावल्याने या बॅनर वॉरला आता वेगळेच रूप आले आहे.

होय बेळगावातील सह्याद्रीनगरात स्मार्टसिटी योजनेतून ८३ लाख रु खर्चातून महाबळेश्वर थीम पार्क उभारण्यात येत आहे. या कामाच्या फलकावर आ. हेब्बाळकर यांनी राज्यातील किंवा केंद्रातील कोणत्याही नेत्याचा फोटो न लावता केवळ आपला फोटो लावून शिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप भाजप ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी करून भाजप नेत्याचे फोटो असलेला फलक लावला होता.

त्यानंतर आता मतदार संघातील जनतेनेच आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीशी उभे रहात केवळ हेब्बाळकर यांचा फोटो असलेला फलक उभारला आहे. या फलकाचे पूजनही जनतेकडून करण्यात आले. यावेळी पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत आहे, त्याबद्दल भाजप नेत्यांनी आधी बोलावे अशी मागणी करण्यात आली.

यापूर्वी नेत्यांमध्ये बॅनर वॉर व्हायचे. पण आता थेट जनतेनेच आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना नैतिक पाठिंबा दर्शवला आहे. आता हे बॅनर वॉर थांबते का भविष्यात आणखी काही वेगळे वळण घेते हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

 

 

 

Tags: