बेळगावात यंदा कर्नाटक राज्योत्सवाची मिरवणूक भव्य प्रमाणात काढण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कन्नड संघटनांनी केली आहे. मात्र तज्ज्ञांशी चर्चा करूनच याबाबत अंतिम निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना संकटामुळे गेली २ वर्षे बेळगावसह राज्यात राजकीय समारंभ, मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी राज्योत्सव मिरवणूक बेळगाव काढलेली नव्हती. यंदाही राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र मिरवणुकीला परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे कन्नडपर संघटनांनी बेळगावात राज्योत्सव मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी यासाठी मोहीम सुरु करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय मेळावे, दसरा उत्सव अशा कार्यक्रमांना परवानगी देता मग राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी का नाही? असा पवित्रा कन्नड संघटनांनी घेतला आहे. या संदर्भात बुधवारी बेळगावात आलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले. राज्योत्सवाच्या भव्य मिरवणुकीला परवानगी देण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. कोरोना संसर्ग कमी झाल्याबाबत तज्ज्ञांनी अहवाल दिल्यावर चर्चा करून निर्णय घेऊ असे बोम्मई यांनी सांगितले.
दरम्यान, कित्तूर उत्सवाच्या उदघाटनासाठी येत्या २३ ऑक्टोबरला बेळगावात येणार आहे. कित्तूर कर्नाटक घोषणा करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय झाला पाहिजे. याबाबत काय करते येते बघू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकंदर कित्तूर उत्सवाच्या उदघाटनाला आपण येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या चर्चेवर पडदा पाडला आहे.


Recent Comments