Belagavi

तलावात विषारी रसायन टाकल्याने ५ लाखांची मत्स्यहानी

Share

 

 

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील कडसगट्टी या गावातील लघुपाटबंधारे तलावात विषारी रसायन टाकल्याने सुमारे पाच लाखांची मत्स्यहानी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

बैलहोंगल तालुक्यातील कडसगट्टी या गावातील लघुपाटबंधारे तलावात मत्स्यपालन केले जाते. यासाठी दरवर्षी निविदाही काढली जाते. परंतु काही अज्ञात लोकांकडून या तलावात विषारी रसायन टाकण्यात आल्याने या तलावातील अंदाजे पाच लाख रुपये किमतीचे मासे मृत्युमुखी पडले आहेत.

या लघुपाटबंधारे तलावात करण्यात येणाऱ्या मत्स्यपालनाच्या उत्पन्नातून गावच्या देवस्थानाचा विकास यासह गावच्या इतर विकासकामे केली जातात. तसेच या तलावातील पाण्याचा उपयॊग बैलहोंगल तालुक्यातील बुडरकट्टी गावासह आसपासच्या पाच गावातील ग्रामस्थांकडून केला जातो. तसेच दरवर्षी या तलावात मत्स्यपालन करण्यासाठी निविदाही मागविण्यात येतात. सध्या या तलावात विषारी रसायन मिसळल्यामुळे या तलावाचे पाणी निरुपयोगी ठरले आहे. याठिकाणी बैलहोंगलचे तहसीलदार भेट देण्यासाठी आले असता, या प्रकारची चौकशी करून योग्य तपास करून, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन बैलहोंगल तालुक्याच्या तहसीलदारांना ग्रामस्थांनी दिले आहे.

Tags: