Chikkodi

इंगळीत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Share

 कर्जाचा बोजा असह्य झाल्याने एका शेतकऱ्याने शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली.

होय, कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, पीकहानी, शेतीमालाला मिळणारी कवडीमोल किंमत आदी कारणांमुळे शेतकऱ्यांचे जीवन असह्य होत चालले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मरणाला कवटाळत आहेत. अशीच एक घटना चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली आहे. ४० वर्षीय हनुमंत मुरचट्टी या शेतकऱ्याने कर्जाच्या बोजाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने इंगळी गावातील बँक, पतसंस्थांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. आलेल्या पिकाच्या विक्रीतून हे कर्ज फेडायचा त्याचा मानस होता. मात्र काही महिन्यांपूर्वी कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे त्याचे पीक कुजून नष्ट झाले. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. त्यातूनच त्याने शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने इंगळी गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अंकली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 

Tags: