अथणी येथील जे. ई. शिक्षण संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्धापन दिनामित्त २१ ऑक्टोबर रोजी शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशन तसेच संग्याबाळ्या या नाटकाचा खेळ दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

के ए लोकापूर पदवी महाविद्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. राम कुलकर्णी माहिती देताना म्हणाले, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आर. एच. कुलकर्णी सभागृहात शतकमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून बेंगळूर येथील साहित्यिक डॉ. के. आर. सिद्दगंगम्मा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मुख्य संपादक अरविंदराव देशपांडे, डॉ. बाळासाहेब लोकापूर, डॉ. व्ही. एस. माळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता कन्नड आणि संस्कृती विभाग बेळगाव आणि श्री के ए लोकापूर पदवी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री सदाशिव संग्याबाळ्या महिला नाटक मंडळाच्या डॉ. लक्ष्मीबाई निलप्पण्णवर सालहळ्ळी यांच्या संग्याबाळ्या या नाटकाचे प्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. राम कुलकर्णी हे भूषविणार आहेत. उदघाटक म्हणून अरविंदराव देशपांडे, मुख्य अतिथी म्हणून कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री यांची उपस्थिती असेल. प्राचार्य आर. एम. देरड्डी यांचीही उपस्थिती असेल, असे राम कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी के. ए. लोकापूर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अरविंदराव देशपांडे बोलताना म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शतक महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यास विलंब झाला आहे. शंभर वर्षांच्या संस्थेच्या इतिहासात अनेक विद्यार्थी आणि इतर संचालकांनी केलेल्या श्रमाची समग्र माहिती या स्मरणिकेत देण्यात आली आहे. हि स्मरणिका संस्थेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरात असली पाहिजे, असे मत अरविंदराव देशपांडे यांनी व्यक्त केले.
संस्थेचे सचिव एस. व्ही. जोशी, सह्कार्यदर्शी रवी कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आर. ए. जोशी, गिरीश कुलकर्णी, निलेश झुरे, एम. पी. मेत्री, आर. ए. नाईक, पी टी पवार आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments