Khanapur

ऐतिहासिक नंदगडमध्ये वीर ज्योतीचे भव्य स्वागत

Share

खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड गावात कित्तूर उत्सवानिमित्त काढलेल्या वीर ज्योतीचे मंगळवारी भव्य स्वागत करण्यात आले.
येत्या २३ व २४ ऑक्टोबरला कित्तूर येथे द्विशतकोत्तरी कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कित्तूरहून काढण्यात आलेल्या वीर ज्योतीचे मंगळवारी नंदगड गावात आगमन झाले. ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या मादार यांनी पुष्पहार घालून, आरती करून विरज्योतीचे स्वागत केले.

त्यानंतर हेब्बाळ, लालवाडी, करंबळ मार्गे वीर ज्योत खानापूरकडे रवाना झाली. ज्योतीच्या स्वागतावेळी ग्रेड-२ तहसीलदार के. वाय. बिदरी, उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांच्यासह महसूल खात्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: