Belagavi

२३ व २४ ऑक्टोबरला होणार कित्तूर उत्सव

Share

 कित्तूर उत्सवाचा द्विशतकोत्तर रौप्यमहोत्सव येत्या २३ २४ ऑक्टोबरला होणार असून त्याच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई येणार आहेत. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

: कित्तूर उत्सवासंदर्भात बेळगावात सोमवारी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, कित्तूरचे आ. महांतेश दौडडगौडर, प्रांताधिकारी ए. सी. बगली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी ‘कित्तूर उत्सव-२०२१’ फलकाचे अनावरण करण्यात आले. फ्लो

यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, कोविड मार्गसूचीच्या अनुसार कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात येईल. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते उत्सवाचे उदघाटन होईल. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याहस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. पर्यटन मंत्री आनंदसिंग, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, उमेश कत्ती, शशिकला जोल्ले, मुरुगेश निराणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कित्तूर उत्सवात चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी कित्तूरचे आ. महांतेश दौडडगौडर म्हणाले, कोरोनामुळे यंदाच्या कित्तूर उत्सवात कुस्तीस्पर्धांचे आयोजन करण्यात येणार नाही. सध्या जिल्हा स्तरावर कित्तूर उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याला राज्यस्तरीय स्वरूप आले पाहिजे. सध्या उत्सवाला १ कोटी रुपये अनुदान सरकारने दिले आहे. अधिक अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी तसेच कित्तूर उत्सव संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: