Belagavi

एसडीपीआय नव्या कार्यकारिणीची निवड 

Share

बेळगाव जिल्हा एसडीपीआय पक्षाच्या २०२१२४च्या कार्यकारिणीची सोमवारी निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी आबिद खान तर उपाध्यक्षपदी खताल अहमद यांची निवड करण्यात आली आहे.

एसडीपीआयचे राज्य सरचिटणीस अफसर कोडलीपेटे यांनी ही माहिती देऊन सांगितले की, सोमवारी बेळगावातील कन्नड साहित्य भवनात राष्ट्रीय समितीचे सदस्य अब्दुल लतीफ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी आबिद खान तर उपाध्यक्षपदी खताल अहमद यांची निवड करण्यात आली.

सरचिटणीसपदी नबीन अंजुम मुगुटखान, सचिवपदी मुजम्मिल, खजिनदारपदी रेहबर मुल्ला आणि कार्यकारिणी सदस्यपदी अफजल, ताजुद्दीन, झकीउल्ला यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी अफसर कोडलीपेटे यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले. त्यानंतर खानापूर येथे अरबाज मुल्ला या युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी कुटुंबाला भरपाई द्यावी, हत्येच्या मागे कोण आहे त्यांना आणि सूत्रधारांना अटक करावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली. यावेळी एसडीपीआयचे प्रसारमाध्यम प्रभारी अक्रम हसन आदी उपस्थित होते.

 

 

Tags: