गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे जलमय झालेल्या बेंगळुरातील बोम्मनहळ्ळी भागातील एचएसआर लेआऊटला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी अचानक भेट देऊन पाहणी केली.

बेंगळुरातील एचएसआर लेआऊटमधील तळ्याच्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील लोकांचे राहणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोम्मई यांनी या परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, अतिवृष्टीमुळे बेंगळुरातील काही वसाहतीत पाणी शिरून लोकांना समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे अशा काही ठिकाणी भेट देऊन पाहणी करत आहे. आणखी काही वसाहतींना उद्या भेट देणार आहे. साचलेले पाणी ओसरण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे पीडितांना भरपाई देण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारंवार मुदत देऊनही रस्त्यातील खड्डे बुजविण्यात येत नसल्याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया न देता बीबीएमपी अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना देऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी बोम्मनहळ्ळीचे आ. सतीश रेड्डी आदी उपस्थित होते.


Recent Comments