Hukkeri

ईद-ए-मिलाद सरकारच्या आदेशानुसार साजरा करा : पीएसआय सिद्रामप्पा

Share

हुक्केरी शहरात, हुक्केरी पोलीस स्थानकात मंगळवारी ईद-ए-मिलाद शांती सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पीएसआय सिद्रामप्पा यांनी पैगंबर जयंती आणि ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण सरकारी मार्गसूचीनुसार आचरणात आणण्यात यावा, असे सांगितले. सरकारने जारी केलेल्या कोविड मार्गसूचीनुसार हा सण शांतिपूर्वक वातावरणात साजरा करण्याचे आदेश दिले.

व्हॉइस: हुक्केरी येथील पोलीस स्थानकात आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पीएसआय सिद्रामप्पा बोलत होते. सरकारी कोविड मार्गसूचीनुसार मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून प्रार्थना करण्यात यावी. मिरवणुकीत लहान मुले आणि वृद्धांचा समावेश असून नये, असे सांगितले.

शहरातील बारा जमातीचे अध्यक्ष डॉ. एस. के. मकानदार आणि भाजप नेते गुरुराज कुलकर्णी यांनी बोलताना असे सांगितले कि सदर सण हा हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्यावतीने बंधुभावनेतून साजरा करण्यात येतो. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

या बैठकीला नगरपालिका अध्यक्ष जयगौडा पाटील, सलीम कलावंत, राजू मुजावर, शहजान बडगावी, मौलाना खाजी साब, प्रज्वल निलजगी, रियाझ मुल्ला, नदाफ, मकानदार, बागवान यांच्यासह बारा जमातीचे सदस्य उपस्थित होते.

Tags: