माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि विरोधी पक्षनेत्याची खुर्ची पकडून ठेवण्यासाठी रा. स्व. संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत टीका करतात. पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचे दिवास्वप्न पाहतात अशी टीका भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली यांनी केली.

सोमवारी बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना एम. बी. जिरली म्हणाले, सिद्दरामय्या याना प्रसिद्धीचा हव्यास आहे. त्यामुळेच ते संघासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर आणि पंतप्रधान मोदींवर सतत टीका करीत राहतात. एकेरी शब्दात मोदींचा उल्लेख करून त्यांनी आपण किती खालच्या पातळीचे आहोत हे दाखवून दिले आहे. मोदींच्या विरोधात बोलल्यामुळे देशातील जनतेत काँग्रेसबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे. सिद्दरामय्या यांना तर म्हैसूरच्या जनतेने झिडकारून लावले. त्यामुळे त्यांना उत्तर कर्नाटकातील बदामी येथून निवडून यावे लागले. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचे दिवास्वप्न ते पाहताहेत अशी टिका केली.
पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केल्याने सिद्दरामय्या यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी जिरली यांनी यावेळी केली.


Recent Comments