क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान यांच्यावतीने बेळगावमध्ये योग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय योग शिबिराचे उदघाटन मधुश्री हुद्दार यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर बोलताना त्यांनी योगासंदर्भात माहिती दिली. योग हे प्राचीन भारताने मानवजातीच्या जगात दिलेले एक अद्वितीय योगदान आहे. सर्वोत्तम जीवनशैली, शारीरिक कामगिरी, निरोगी जीवनाचे ध्येय, मानसिक स्थिरता आणि संतुलन राखणे म्हणजे योग आहे, असे त्या म्हणाल्या.
यानंतर योग शिबिराच्या आयोजक शैला पाटील बोलताना म्हणाल्या, योगामुळे अनेक शारीरिक व्याधींपासून सुटका मिळते. ऍसिडिटी, श्वसनाचा त्रास, मधुमेह, थायरॉईड, बीपी यासारख्या अनेक रोगांपासून योगामुळे नियंत्रण ठेवता येते
यावेळी क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मंगल मठद, सचिव रत्ना गुडेर, रेणुका कांबळे तसेच चारुशीला पायाप्पाण्णावर, हेमा बरबरी, शोभा काडण्णवर आदींसह इतर उपस्थित होते.


Recent Comments