नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून पारंपरिक कला जोपासण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत असे विचार शिवानंद स्वामीजी यांनी व्यक्त केले.

रायबाग तालुक्यातील हंदीगुंद येथे नवरात्रीनिमित्त दुर्गादेवी गिगीपद मेळ जानपद कलापोषक संघातर्फे लोक कलाकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी बोलताना शिवानंद स्वामीजी म्हणाले, कर्नाटकात अनेक लोककला जिवंत आहेत. त्या भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून लोककलाकारांना प्रोत्साहित केले पाहिजे. 
यावेळी लोककलाकारांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी बालसाहित्यिक लक्ष्मण चौरी, ललितकला अकादमीचे सद्य जयानंद मादर, प्रसिद्ध गझलकार अल्लागीरीराज, कोप्पळ संघाच्या अध्यक्ष महादेवी देवरु, अमर कांबळे आदी उपस्थित होते.


Recent Comments