Belagavi

राजहंसगडावर सीमोल्लंघन, दसरा उत्साहात साजरा

Share

 बेळगाव तालुक्यातील राजहंसगड येथे शुक्रवारी दसरा सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

नऊ दिवस राजहंसगड गावातील श्री सिद्धेश्वर देवस्थानची पालखी किल्ल्यावर मुक्कामी राहून विजयादशमी दसरा निमित्त गडावरती दवणा स्वरूपात रव वाहुन विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. मागील वर्षी कोरोना काळात हा उत्सव जरा कमी उत्साहात साजरा केला होता. मात्र यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने परिसरातील सर्वच भाविकांनी मोठ्या संख्येने गडावरती दर्शनासाठी हजेरी लावली. अनेक दुकानदारांनी दुकाने थाटल्याने  पहाटे पाच वाजल्यापासूनच सायंकाळी सात वाजेपर्यंत गडावरील मंदिर व किल्ला परिसर भाविकांनी फुलून गेला होता.सायंकाळी पाच वाजता श्री सिद्धेश्वर देवस्थान व पालखीची विधिवत पूजाअर्चा करून या वर्षीच्या पालखीचे मानकरी प्रशांत नावगेकर, नागेंद्र  थोरवत, सचिन थोरवत, सिद्धाप्पा नावगेकर, सिद्धाप्पा हाळब यांच्या हस्ते पालखी मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून डोंगर कपारीतून मार्गस्थ होऊन राजहंसगडाकडे प्रस्थान झाले. त्यानंतर रात्रभर भजन व विद्युत रोषणाई च्या तालावर गावभर मिरवून ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात आला.

तत्पूर्वी राजहंसगड किल्ल्यावरील मंदिराला अत्याधुनिक स्वरूपाची कायमस्वरूपी देणगी पेटी व साऊंड सिस्टिम देणगी स्वरुपात अर्पण केल्याने गावातील विलास मल्लाप्पा कुंडेकर व नागेंद्र सिद्धाप्पा थोरवत तसेच कमल नगर येथील नागो कोरवी यांचा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी व किल्ला सुधारणा कमिटी यांच्यामार्फत शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी धाकलू इंगळे, रूक्मान्ना हावळ, सिद्धाप्पा छत्रे, सुरेश थोरवत, बसवंत पवार, गणू हावळ, हनमंत नावगेकर, जयराम कुंडेकर, शिपया बुर्लकट्टी, सिद्धाप्पा गणपत पवार, परशराम अंनगोळकर, उमेश पवार, किरण पाटील, मोनेश्री थोरवत, रामचंद्र थोरवत, भाऊराव पवार तसेच पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Tags: