बेळगावातील विस्तार फौंडेशनतर्फे रविवारी गोरगरीब, असहाय्य मुलांना अन्नदान करण्यात आले.

बेळगावातील रामनगरातील श्री दुर्गादेवी मंदिरात रविवारी आयोजित कार्यक्रमात विस्तार फौंडेशनच्या वतीने गोरगरीब, असहाय्य मुलांना अन्नाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. कर्नाटक पाणी पुरवठा मंडळाच्या संचालिका दीपा कुडची यांनी अन्नदान केले.
यावेळी विस्तार फौंडेशनचे पदाधिकारी आरती अंगडी, भीमराव पुरोहित, नागराज, मारुती बडसकर, रवी गाडीवड्डर, मारुती बिदरोळी, तिम्माण्णा, लक्ष्मीबाई पुजारी आदी उपस्थित होते.


Recent Comments